Thursday, November 8, 2007

पाऊस मना-मनांचा!

पाऊस ढगांचा
पाऊस मेघांचा
पाऊस सौदामीनीचा
पाऊस वसुंधरेचा
पाऊस गारांचा
पाऊस थेंबांचा
पाऊस सरींचा
पाऊस ओल्या मातीचा
पाऊस तरुवल्लरींचा
पाऊस घनराईंचा
पाऊस वनराईंचा
पाऊस मनमोराचा
पाऊस पक्ष्यांचा
पाऊस प्राण्यांचा
पाऊस नद्या-नाल्यांचा
पाउस मना-मनांचा
पाऊस माझा
पाऊस तुझा
पाऊस इतरांचा
पाऊस सर्वांचा!

श्रावणातल्या रेशीमसरींनो

श्रावणातल्या रेशीमसरींनो
बरस बरस बरसाहो
भावकळ्यांना शब्दफुलांना
म्रदगंध नाहवा हो

श्रावणातल्या रेशीमसरींनो
माहेरी जाऊनी या हो
त्या तिथल्या अंगणातल्या
आठवणी मज सांगा हो

श्रावणातल्या रेशीमसरींनो
आठवते कां छोटीशी "मी"
जरा विसावा त्या वाटेवर
भेटतील माझ्या मैत्रीणी हो

श्रावणातल्या रेशीमसरींनो
बहु भाग्यवान तुम्ही अहा
त्या मातीचा गंध कांहीसा
मजसाठीही घेऊनी या हो

श्रावणातल्या रेशीमसरींनो
काय तुम्हांस देऊ मी
सखया माझ्या तुम्ही गं सार्‍या
मन माझे घेऊनी जा हो!

पावसाचे रंग सारे

पावसाचे रंग सारे
पानांमध्ये दडुन बसले
त्या पानांच्या गालावरती
थेंबांचे बघ मोती सांडले

पावसाचे रंग सारे
वनराईने लुटुनी घेतले
रेशीमसरींना अम्रुत सरींना
घनराईने कवेत घेतले

पावसाचे रंग सारे
चोहीकडे बघ कसे विखुरले
मातीमधुनी त्रुप्त सुखाचा
धुंद-गंधीत सुगंध दरवळे

पावसाचे रंग सारे
तरु-वेलींच्या कुशीत लपले
फळा-फुलांना अन कलिकांना
कीती, कसे हो रंग वाटले?????

पावसाचे रंग सारे
भू मायेसी बिलगु लागले
नटली-थटली अवनी माई
बघा कसे सौंदर्य हे खुलले

पावसाचे रंग सारे
मन-मनाला रंगुन गेले
मनाभोवती रिमझिम रिमझिम
सोनसरींचे खेळ रंगले

आपलं नसतानाही............

कुणीतरी आठवणींने एखाद्याला आठवावं.......
कुशल-मंगल विचारावं.........
ह्यापलिकडली..... अपेक्षा ती काय?????
आयुष्य जगताना.... हेच तर भान ठेवायचं असतं....
आपल्या आजुबाजुला इतरांचंही जग असतं......
ते आपल्याशी न जोडताही..... आपलं असतं.....
कारण कधितरी..... केव्हातरी.... कुणीतरी
आपलं नसतानाही............
आपल्याला आपलं मानत असतं........

आयुष्य.............

आयुष्य............. जगतानाही
आपलं वाटणारं.... न वाटणारं
एक आकर्षण...........

आयुष्य....... अंतापर्यंत जगायला
भाग पाडणारं...... जगणारं
गुढ विलक्षण............

आयुष्य.......जगाचं............ व्यावहारिक.....
प्रांपंचीक.....सामाजिक...प्रासादिक
विश्लेषण............

आयुष्य......पर्मात्म्याने
जीवा-शीवाशी जोडलेलं
बंधन............

बघ नं जरा अंतरंग न्याहाळुन!

मनाचा ठाव घेता आला असता तर........
तर मी त्यालाच सर्व कांही सांगीतलं असतं
तुला ते कळण्याइतपत....... नक्किच असलं असतं!

नयनांची भाषा तु ज़ाणली असती तर....
तर मला बघण्याची ओढही तेवढीच असली असती
सुक्ष्मांनाही जाणिव होईल....जरा डोळे मीटुन तर बघ!

भावना कळ्तात कां कधि एक-मेकांना???
खरं सांग...खरं खरं सांग
कां जाणुन बुजुन, पेडगांवला जाणे... ह्यालाच म्हणतात!

ओढ काय असते ....... मला नसणार कां ठाऊक???
ह्रदयांची भाषा मलाही समजते कांहीशी
सीमा मर्यादा काळाचं बंधन.... जायचं नसतं असं ओलांडुन!

तुझं येणं हर्षाचं आंदण... आणि जाणं किती जीवघेणं
गोड गुपीतं स्वत:च उलगडायची असतात
बघ नं जरा अंतरंग न्याहाळुन!

प्रेम म्हणजे प्रेम फक्त..............

प्रेम म्हणजे काय
घडाभर पाणि????
तहान लागली ..... पीऊन टाकलं
संपलं सारं........................

प्रेम म्हणजे काय
निरभ्र आकाश?????
ढग जमल्यावर .... आलं झाकोळुन
संपलं सारं.........................

प्रेम म्हणजे अद्वैत भक्ति
राधेची प्रिती...... मीरेची विरक्ती
प्रेम म्हणजे प्रेम फक्त..............
प्रेम म्हणजे शाश्वत ईशशक्ती!

प्रेम अद्वैत शाश्वत निरामयी जणू

प्रेम नजरेत असतं
दोन मनांच्या भावविश्वात असतं
प्रेम मागून मीळत नसतं
प्रेमानेच प्रेम जींकायचं असतं

प्रेम श्वासांगणीक बोलत असतं
ह्रदयातुन हुंकारत असतं
प्रेम मागायचं नसतं
ते अनुभुतीतून जाणायचं असतं

प्रेम सफळ होणे म्हणजे काय???नुसती लग्नगांठ????
नाही..... असं मुळीच नसतं
प्रेम अद्वैत शाश्वत निरामयी जणू
म्हणुनच प्रेम दोन जीवांच्या अद्रुष्य सहवासात शोधायचं असतं

लवलवे पापण्या नेहांच्या

लवलवे पापण्या नेहांच्या
ही चाहुल शुभशकुनाची
येईल हं प्रियकर माझा
सांगे गुज मनकवडी
मधुमल्लिके बहरशील कां
होऊनी गंधीत प्रिये वल्लिका
व्हावे तू गं मीच जराशी
प्रीयास माझ्या भुलवशील कां
गुलमोहरा बरस बरस हो
रंग केशरी तुझा
अन येता प्रियतम या वाटेवर
झुलव सुमांचा झूला
रुतुराजसा जा सांग तयाला
मी वाट पाहते त्यांची
अन घेऊनी येता फ़ीरुनी त्यांन्ना
तू फुलव बाग फुलांची

मी न जाणिले

मी न जाणिले
तू न जाणिले
गंधले असे कसे
हे हे प्रेम मुग्धसे
ह्रदयी प्रेम मुग्धसे......
पाहिले तुला न मी
न तुही मला पाहीले
प्रीत धुंधीत या
सांग कोण लाजले
हे हे प्रेम मुग्धसे
पाहिले तुला न मी
कां ध्यास तुझा या जीवा
छंद हा नवा नवा
तुझीच व्हावी प्रिया
हे हे प्रेम मुग्धसे
पाहिले तुला न मी
परि चित्र मनी रेखीले
भाव मधु अंतरीचे
तुज सख़्या अर्पिले
हे हे प्रेम मुग्धसे
पाहिले तुला न मी
परि सदैव तू मन्मनी
सां येशील कधी तू
भेट द्यावया पहिली
हे हे प्रेम मुग्धसे
ह्रदयी प्रेम मुग्धसे......