Thursday, November 8, 2007

पावसाचे रंग सारे

पावसाचे रंग सारे
पानांमध्ये दडुन बसले
त्या पानांच्या गालावरती
थेंबांचे बघ मोती सांडले

पावसाचे रंग सारे
वनराईने लुटुनी घेतले
रेशीमसरींना अम्रुत सरींना
घनराईने कवेत घेतले

पावसाचे रंग सारे
चोहीकडे बघ कसे विखुरले
मातीमधुनी त्रुप्त सुखाचा
धुंद-गंधीत सुगंध दरवळे

पावसाचे रंग सारे
तरु-वेलींच्या कुशीत लपले
फळा-फुलांना अन कलिकांना
कीती, कसे हो रंग वाटले?????

पावसाचे रंग सारे
भू मायेसी बिलगु लागले
नटली-थटली अवनी माई
बघा कसे सौंदर्य हे खुलले

पावसाचे रंग सारे
मन-मनाला रंगुन गेले
मनाभोवती रिमझिम रिमझिम
सोनसरींचे खेळ रंगले

No comments: