Sunday, December 10, 2017

तबला, पखवाज जुगलबन्दीचा आविष्कार




उस्ताद अक्रम खान (तबला) आणि पंडित रवीशंकर उपाध्याय (पखवाज) यांच्या जुगलबन्दीच्या आविष्काराने सातव्या स्वरमंगेश महोत्सवाला रंग भरला. ताल, लय, ठेका याचा अनोखा मिलाफ आणि कलाकारांची एकमेकांना मिळत असलेली साथ याने जुगलबन्दी अधिकच रंगत गेली. एकूणच या कार्यक्रमाने सभागृहातला माहोल तालमय झाला होता.
उपस्थित श्रोत्यांनी उत्सफूर्त दाद देत कलाकारांचे कौतुक केले. रविवारी सकाळी उद्योजक राजेश तारकर यांच्या हस्ते स्वरमंगेश महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योजिका दीपा तारकर, सदानंद देसाई, दिलीप सहकारी, स्वस्तिक संस्थेचे विनयकुमार मंत्रवादी, सचिव मुरूगेश रमण आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना राजेश तारकर म्हणाले, शास्त्रीय संगीत हे अध्यात्माची सांगड घालणारे माध्यम आहे. संगीत देवत्वाकडे नेते त्यामुळेच ते मनापर्यंत थेट पोचते. संगीताची जादू ज्यांना उमगली ते भाग्यवान आहे, असेही ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी डॉ.प्रवीण गावकर यांच्या कार्याची दखल घेत असे महोत्सव आयोजित करणे महान कार्य असल्याचे सांगून डॉ.गावकर यांचे कौतुक केले. अशा कार्यक्रमांसाठी आपला सदैव पुढाकार असून, यापुढेही या स्वरमंगेश महोत्सवासाठी आपण सदैव सहकार्य करणार असे त्यांनी आश्वासन दिले.
विनयकुमार मंत्रवादी यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ दिले. डॉ.प्रवीण गावकर यांनी स्वागत केले. प्रा.गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले व त्यांनीच आभार मानले. त्यानंतर मीता पंडित यांची शास्त्रीय गायनाची मैफल झाली. त्यांना दयानिधेश कोसंबे, सिंधू हेगडे आदींनी संगीतसाथ दिली. दुपार नंतरच्या सत्रात रूद्रशंकर मिश्रा यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पंडित प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन झाले. उस्ताद रशीद खान यांच्या मैफलीने स्वरमंगेश महोत्सवाची सांगता झाली.

उस्ताद अक्रम खान (तबला) आणि पंडित रवीशंकर उपाध्याय (पखवाज) यांची जुगलबन्दी

स्वरमंगेश महोत्सवात दीपप्रज्ज्वलन करताना राजेश तारकर. सोबत डाविकडून दीपा तारकर, विनयकुमार मंत्रवादी, सदानंद देसाई.


Saturday, December 9, 2017


मंगेशकरांच्या गायकीत शास्त्रीय संगीताची बैठक
"स्वरमंगेश" महोत्सवात पंडित सत्यशील देशपांडे यांचे मत

मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या नाट्यगीतांमध्ये शास्त्रीय संगीताची बैठक आहे. त्यामुळे समकालीन गायक कलाकारांपेक्षा त्यांची गायकी सर्वांहून वेगळी होती, असे मत गायक, संगीत समीक्षक पंडित सत्यशील देशपांडे यांनी कला अकादमीत व्यक्त केले.
पणजीतील स्वस्तिक या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल कार्य करणार्‍या संस्थेतर्फे आयोजित सातव्या स्वरमंगेश महोत्सवातील पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पंडित देशपांडे यांचे "मास्टर दिनानाथ मंगेशकरांची गायकी" या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या विषयावर भाष्य करताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी दिनानाथ मंगेशकरांच्या ध्वनीफितीतील काही नाट्यगीते रसिकांना ऐकवली. व त्यातूनच उदाहरणे देत त्यांच्या गायकीविषयी विश्लेषण केले. ते पुढे म्हणाले, मास्टर केशवराव भोसले आणि बालगंधर्वांची प्रेरणा घेऊन दिनानाथांनी नाट्यसृष्टीत पदार्पण केले. परंतु त्या दोघांच्या गायकीची छाप दिनानाथांच्या गायकीत आढळत नाही. दिनानाथ मंगेशकरांनी आपल्याकडील प्रतिभेच्या जोरावर गायकीत वेगळी वाट चोखाळली. त्यांची गायकी इतरांहून वेगळी होती. त्याकाळी अनेकांनी त्यांच्या गायकीवर टीका केली. परंतु दीनानाथांनी आपल्या प्रतिभेला अधिकच धारदार बनविले. ऐन चाळीशीत दीनानाथ मंगंशकर गेले. ते अधिक जगले असते तर नाट्यसंगीताला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले असते. शास्त्रीय संगीतांमध्ये त्यांनी अधिक कार्य केले असते, असे पुढे पंडित देशपांडे म्हणाले. दिनानाथ मंगेशकर असा एकमेव गायक कलाकार होता, ज्यांची त्याकाळी ध्वनीफित निघाली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दिनानाथांनी गाण्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. ते म्हणायचे "माझे गाणे सुरांचे आहे, आपण जे गातो ते माझे गाणे नाही", असे पंडित देशपांडे यांनी यावेळी सांगितले. या व्याख्याना दरम्यान विविध उदाहरणे देत त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीविषयी आपले विचार मांडले.
व्याख्यानाआधी डॉ.प्रवीण गावकर यांची शास्त्रीय गायन मैफल झाली. त्यांना सारंगीवर पंडित संगीत मिश्रा, तबल्यावर दयानिधेश कोसंबे, संवादिनीवर दत्तराज म्हाळशी, तर तानपुर्‍यावर सिंधू हेगडे यांनी संगीतसाथ केली. स्वरमंगेश महोत्सवातील पहिले सत्र स्वराली पणशीकर यांच्या मैफलीने सुरू झाले. त्यानंतर योगराज नाईक यांचे सतार वादन झाले. हेतल गंगानी आणि प्रा.गोविंद भगत यांनी बहारदार निवेदन केले.


गायन सादर करताना डॉ.प्रवीण गावकर. संगीतसाथ करताना दयानिधेश कोसंबे, सिंधू हेगडे

पंडित सत्यशील देशपांडे




Thursday, December 7, 2017

Aqua Goa 2017 a" Mega Fish Festival"

Governor, Dr. ( Smt. ) Mridula Sinha seen inaugurating Aqua Goa 2017 a" Mega Fish Festival" at Campal on Dec. 7, 2017. In the presence of Chief Minister ,Shri Manohar Parrikar , Minister for Fisheries Shri Vinod Palyenkar, Minister for TCP, Shri , Vijay Sardesai, Dy, Speaker , Shri Micheal Lobo, Secretary Fisheries ,Shri Govind Jaiswal,  Dr. Renuka Da Silva,Chairperson SGPDA and others are also seen.

कला अकादमीत 9 रोजीपासून "स्वरमंगेश"


सातवा शास्त्रीय संगीत, नृत्य महोत्सव; दिग्गज कलाकारांच्या मैफली; स्वस्तिक संस्थेतर्फे आयोजन


गोमंत सुपूत्र संगीतरत्न, रंगभूमीचे कलाकार मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतीप्रित्यर्थ सातवा "स्वरमंगेश" शास्त्रीय संगीत, नृत्य महोत्सव शनिवार दि.9 ते रविवार दि.10 रोजीपर्यंत कला अकादमीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्वस्तिकचे अध्यक्ष डॉ.प्रवीण गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल क्राऊनमध्ये घेतलेल्या या पत्रकार परिषदेला व्यासपीठावर हॉटेल क्राऊनचे क्लाऊडियो, एलआयसीचे मंगेश गावकर, राजदीप बिल्डरर्सचे अध्यक्ष राजेश तारकर, तसेच स्वस्तिकचे सचिव मुरुगेश रमण यावेळी उपस्थित होते. डॉ.गावकर यांनी यावेळी महोत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली.
स्वस्तिकतर्फे आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव खर्‍या अर्थाने मास्टर दीनानाथ मंगेशकरांना वाहिलेली सुरांची मानवंदना असल्याचे यावेळी डॉ.गावकर यांनी सांगितले. या महोत्सवाचे वेगळेपण कायम राखताना यावर्षी गायन, वादन व नृत्य अशा तिन्हीही कलांचा अविष्कार रसिकांना अनुभवायला मिळणार असल्याचे पुढे त्यांनी सांगितले. 9 रोजी दुपारी 3.30 कला अकादमीच्या कृष्णकक्षात गोमंतकीय कलाकार स्वराली पणशीकर यांची शास्त्रीय गायन मैफल होईल. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता योगराज नाईक यांचे सतार वादन होईल. 5.30 वाजता डॉ.प्रवीण गावकर यांची मैफल तर 6.30 वाजता गायक, संगीत समीक्षक पंडित सत्यशील देशपांडे यांचे दिनानाथांच्या गायकीवर व्याख्यान होणार आहे. पहिल्या दिवसाची सांगता या व्याख्यानाने होणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.

"स्वरमंगेश"चे उद्घाटन 10 रोजी
स्वरमंगेश शास्त्रीय संगीत, नृत्य महोत्सवाचे उद्घाटन 10 रोजी सकाळी 11.30 वाजता कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, गोवा राज्य कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, राजेश तारकर आदींच्या उपस्थित होणार आहे. त्याआधी सकाळी 9.30 वाजता पंडित शौनक अभिषेकी यांची गायन मैफल होईल. 10.30 वाजता उस्ताद अक्रम खान (तबला) आणि पंडित रवीशंकर उपाध्याय (पखवाज) यांची जुगलबदी होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर 12 वाजता मीता पंडित यांची गायन मैफल होईल. दुपारी 4 वाजता रूद्रशंकर मिश्रा यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होईल. 5 वाजता पंडित प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन होईल. 6 वाजता उस्ताद रशीद खान यांच्या मैफलीने स्वरमंगेशची सांगता होईल. पंडित शुभांकर बॅनर्जी, मुकुंद पेटकर, मुराद अली, संगीत मिश्रा, मुकुंदराज देव, सोमनाथ मिश्रा, दयेश कोसंबे, राया कोरगावकर, किशोर पांडे, अमर मोपकर, दत्तराज म्हाळशी सर्व कलाकारांना संगीतसाथ करणार आहेत. प्रा.गोविंद भगत आणि हेतल गंगानी कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. गोमंतकीय संगीत रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.प्रवीण गावकर यांनी केले आहे. या महोत्सवाला राजदीप बिल्डर्स, गोवा कला व संस्कृती खाते, कला अकादमी गोवा, केंद्रीय संस्कृती मंत्रालय, गोवा पर्यटन खाते, एन.आर.बी.ग्रुप, सहकारी इन्वेस्टमेंट, जय गणेश इस्पात, सदानंद देसाई, यांचे मुख्य सहकार्य लाभलेले आहे. महोत्सवातील कलाकारांच्या आदरातिथ्याची जबाबदारी हॉटेल फिदाल्गो, हॉटेल डेल्मॉन, हॉटेल पार्क प्राईम, हॉटेल ला कॅपीटोल, हॉटेल कांपाल यांनी सांभाळली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, रसिकांनी याचा लाभ घ्यावा.



स्वरमंगेश महोत्सवाची माहिती देताना डॉ.प्रवीण गावकर. डाविकडून क्लाऊडियो, मंगेश गावकर, राजेश तारकर आणि मुरुगेश रमण.

Wednesday, December 6, 2017

Goa State Film Festival in April
...................................................................................................................................................................

The 9 th edition of the Goa State Film Festival for Feature Films in
Konkani/Marathi and Non Feature Films in
Konkani/Hindi/Marathi/English will be held in April 2018.
The films which are completed from 1 st January 2016 to 31 st
December 2017 will be eligible for this festival. The Entertainment
Society of Goa appeals to all the producers, whose films are on the
final stage of completion to complete the film and get censor certificate
and sub titles done by 31 st Dec 2017 in order to be part of this festival.
ESG has organized various activities to support local producers,
directors, actors and technicians. For the past year, we have
organized National Award Winning Film Festival, European Film
Festival, Girish Kasaravalli Film Festival, regular Thursday screening
of our Cinephile Club, which provided a platform to all film enthusiasts
and film professionals to watch world acclaimed cinema.
ESG Vice president Rajendra Talak said, in order to encourage the young film makers ESG organized Anti Tobacco Film Festival (Short & Ad films), Environmental Short Film
Competition. We have also organized Film Appreciation Workshop &
Film Journalism Workshop by renowned film expertise and journalists.
ESG appeals to all the Goan film makers and associations to log
on www.esg.co.in to get an update of the activities organized by us.
The ESG Cinephile Club will commence their regular Thursday
screening from 14 th December 2017.
I N V I T A T I O N

Friday, September 2, 2016