गोमंत
सुपूत्र संगीतरत्न,
रंगभूमीचे
कलाकार मास्टर दीनानाथ मंगेशकर
स्मृतीप्रित्यर्थ सातवा
"स्वरमंगेश"
शास्त्रीय
संगीत,
नृत्य
महोत्सव शनिवार दि.9
ते
रविवार दि.10
रोजीपर्यंत
कला अकादमीत आयोजित करण्यात
आला असल्याची माहिती स्वस्तिकचे
अध्यक्ष डॉ.प्रवीण
गावकर यांनी पत्रकार परिषदेत
दिली.
हॉटेल
क्राऊनमध्ये घेतलेल्या या
पत्रकार परिषदेला व्यासपीठावर
हॉटेल क्राऊनचे क्लाऊडियो,
एलआयसीचे
मंगेश गावकर,
राजदीप
बिल्डरर्सचे अध्यक्ष राजेश
तारकर,
तसेच
स्वस्तिकचे सचिव मुरुगेश रमण
यावेळी उपस्थित होते.
डॉ.गावकर
यांनी यावेळी महोत्सवाविषयी
सविस्तर माहिती दिली.
स्वस्तिकतर्फे
आयोजित करण्यात येणारा हा
महोत्सव खर्या अर्थाने मास्टर
दीनानाथ मंगेशकरांना वाहिलेली
सुरांची मानवंदना असल्याचे
यावेळी डॉ.गावकर
यांनी सांगितले.
या
महोत्सवाचे वेगळेपण कायम
राखताना यावर्षी गायन,
वादन
व नृत्य अशा तिन्हीही कलांचा
अविष्कार रसिकांना अनुभवायला
मिळणार असल्याचे पुढे त्यांनी
सांगितले.
9 रोजी
दुपारी 3.30
कला
अकादमीच्या कृष्णकक्षात
गोमंतकीय कलाकार स्वराली
पणशीकर यांची शास्त्रीय गायन
मैफल होईल.
त्यानंतर
दुपारी 4.30
वाजता
योगराज नाईक यांचे सतार वादन
होईल.
5.30 वाजता
डॉ.प्रवीण
गावकर यांची मैफल तर 6.30
वाजता
गायक,
संगीत
समीक्षक पंडित सत्यशील देशपांडे
यांचे दिनानाथांच्या गायकीवर
व्याख्यान होणार आहे.
पहिल्या
दिवसाची सांगता या व्याख्यानाने
होणार असल्याचे गावकर यांनी
सांगितले.
"स्वरमंगेश"चे
उद्घाटन 10
रोजी
स्वरमंगेश
शास्त्रीय संगीत,
नृत्य
महोत्सवाचे उद्घाटन 10
रोजी
सकाळी 11.30
वाजता
कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ
मंगेशकर नाट्यगृहात केंद्रीय
आयुषमंत्री श्रीपाद नाईक,
गोवा
राज्य कला आणि संस्कृती मंत्री
गोविंद गावडे,
राजेश
तारकर आदींच्या उपस्थित होणार
आहे.
त्याआधी
सकाळी 9.30
वाजता
पंडित शौनक अभिषेकी यांची
गायन मैफल होईल.
10.30 वाजता
उस्ताद अक्रम खान (तबला)
आणि
पंडित रवीशंकर उपाध्याय
(पखवाज)
यांची
जुगलबदी होईल.
उद्घाटन
सोहळ्यानंतर 12
वाजता
मीता पंडित यांची गायन मैफल
होईल.
दुपारी
4
वाजता
रूद्रशंकर मिश्रा यांचा कथ्थक
नृत्याचा कार्यक्रम होईल.
5 वाजता
पंडित प्रवीण गोडखिंडी यांचे
बासरीवादन होईल.
6 वाजता
उस्ताद रशीद खान यांच्या
मैफलीने स्वरमंगेशची सांगता
होईल.
पंडित
शुभांकर बॅनर्जी,
मुकुंद
पेटकर,
मुराद
अली,
संगीत
मिश्रा,
मुकुंदराज
देव,
सोमनाथ
मिश्रा,
दयेश
कोसंबे,
राया
कोरगावकर,
किशोर
पांडे,
अमर
मोपकर,
दत्तराज
म्हाळशी सर्व कलाकारांना
संगीतसाथ करणार आहेत.
प्रा.गोविंद
भगत आणि हेतल गंगानी कार्यक्रमाचे
निवेदन करणार आहेत.
गोमंतकीय
संगीत रसिकांनी या कार्यक्रमाचा
लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.प्रवीण
गावकर यांनी केले आहे.
या
महोत्सवाला राजदीप बिल्डर्स,
गोवा
कला व संस्कृती खाते,
कला
अकादमी गोवा,
केंद्रीय
संस्कृती मंत्रालय,
गोवा
पर्यटन खाते,
एन.आर.बी.ग्रुप,
सहकारी
इन्वेस्टमेंट,
जय
गणेश इस्पात,
सदानंद
देसाई,
यांचे
मुख्य सहकार्य लाभलेले आहे.
महोत्सवातील
कलाकारांच्या आदरातिथ्याची
जबाबदारी हॉटेल फिदाल्गो,
हॉटेल
डेल्मॉन,
हॉटेल
पार्क प्राईम,
हॉटेल
ला कॅपीटोल,
हॉटेल
कांपाल यांनी सांभाळली आहे.
हा
कार्यक्रम सर्वांसाठी खुला
असून,
रसिकांनी
याचा लाभ घ्यावा.

No comments:
Post a Comment