Thursday, April 16, 2026



 

स्वागत "नारी शक्ती वंदन" अभियान: अखेर प्रतीक्षा संपली. "नारी शक्ती वंदन" अभियानाचे  गोव्यातही सर्व क्षेत्रातील महिलांकडून जोरदार स्वागत झाले. महिलांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आणि निर्णयाचा गौरव केला. परिषदांबरोबरच विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले. राजकीय क्षेत्रातील महिलांपासून ते अगदी शैक्षणिक, औद्योगिक, साहित्यिक आदी सर्व क्षेत्रातील महिलांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजातील स्त्री नेतृत्वाचे प्रदर्शन या अभियानाचे स्वागत करताना दिसले. तसेच  गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी गोवाभरात झालेल्या कार्यक्रमांमध्ये महिलांचे स्वागत केले. 

आयुर्वेदाचार्य स्नेहा भागवत यांनी पणजीत नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गोवाभरातील विविध क्षेत्रातील महिला प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होत्या. यात आयडा मुखर्जी यांचे प्रभावी मार्गदर्शन उपस्थित महिलांना लाभले. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी या अभियानाचे महत्व पटवून दिले. पणजीतील इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझातील कार्यक्रमांमध्ये, सभागृहे  खचाखच भरली होती. यावरून महिलांचा उत्साह दिसत होता. राज्यात ठिकठिकाणी असेच कार्यक्रम झाले. त्यातही महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. 

























Wednesday, April 8, 2026

 


डॉ.प्रो.स्नेहा सुवास प्रभु महांबरे यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार 


गोव्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ , लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ.प्रो.स्नेहा सुवास प्रभु महांबरे यांना महाराष्ट्रातील शब्दगंध साहित्यिक परिषदेचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या "सृजनाकडून सर्जनशीलतेचा प्रवास" या संशोधनात्मक ग्रंथाला हा पुरस्कार लाभला आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. 

त्यांनी गोमंतकीय शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे "डी .डी . कोसंबी (वरिष्ठ गट) फेलोशिप देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'रणमाले' या लोककला प्रकाराचा चिकित्सक अभ्यास (गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांतील क्षेत्रीय पाहणी करून हा मुद्रित संशोधनात्मक प्रबंध सादर केला आहे.) त्या संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय, पेडणे-गोवा येथील मराठी विभागात पीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. "गोमंतकीय निवडक लोककलांचा चिकित्सक अभ्यास" हा त्यांचा पीएचडीसाठीचा प्रबंध. सरकारी महाविद्यालय सांखळी गोवा येथे त्यांनी ३३ वर्षे प्रोफेसर आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले आहे. त्यांची संशोधनात्मक आणि संपादित पुस्तके आहेत. कार्यक्रम आयोजन, युवकांना मार्गदर्शन, कविसंमेलने अश्या विविध कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. हल्लीच मनसा क्रिएशन्स या प्रतिष्ठित संस्थेतर्फे "मनसा सन्मान २०२६" देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. 

डॉ.प्रो.स्नेहा सुवास प्रभु महांबरे


मनसा क्रिएशन्स या प्रतिष्ठित संस्थेतर्फे "मनसा सन्मान २०२६" देऊन डॉ.प्रो.स्नेहा सुवास प्रभु महांबरे यांचा गौरव करताना इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष, पर्यटन विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक दीपक नार्वेकर, राजदीप बिल्डर्सच्या कार्यकारी संचालक दीपा तारकर आणि मनसा क्रिएशन्सच्या संस्थापक संचालिका प्रिया कालिका बापट. 



Tuesday, April 7, 2026


                                                               प्रा.राधिका नागवेकर यांचे "मुक्काम पोस्ट मन" प्रकाशित  

                                                                    गोमंतकीय मराठी साहित्य सृष्टीत नवीन पुस्तकाची भर 

                                                                                प्रथमच पत्ररूपात ललित लेख संग्रह 



गोमंतकीय युवा लेखिका प्रा. राधिका नागवेकर यांच्या "मुक्काम पोस्ट मन" या ललित लेख संग्रहाचे नुकतेच पिळर्ण येथे प्रकाशन झाले. यावेळी राधिका यांचे मित्रमंडळ, कुटुंबीय, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.कुलदीप कामत यांनी पुस्तकावर भाष्य करताना लेखिकेच्या संवेदनशील लेखणीचे कौतुक केले. पदार्पणातच एक चांगले पुस्तक गोमंतकीय साहित्य सृष्टीला बहाल केले आहे, अश्या शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुस्तकावर बोलताना डॉ.नीता तोरणे म्हणाल्या, राधिकाच्या लेखणीत धार आहे. या जोरावरच राधिका साहित्य सृष्टीत मोलाचे कार्य कारणार आहे. प्रिया कालिका बापट म्हणाल्या, राधिका ही गोव्यातील युवा कवयित्री, लेखिकांमधील अग्रणी असे व्यक्तिमत्व असून पदार्पणातच ललित लेख संग्रह प्रकाशित करून तिने षटकार मारला आहे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त करताना राधिका यांचे कौतुक करून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. स्थानिक उपसरपंच तसेच श्री. कुडव यावेळी उपस्थित होते. प्रा.स्नेहा जांबोटकर आणि स्नेहा मोरजकर यांनी पुस्तकातील लेखांचे वाचन केले. राधिकाच्या आई प्रतिमा नागवेकर यांनी आभार मानले. तर सुश्मिता यांनी सूत्रसंचालन केले. 
पुस्तकावर बोलताना प्रिया कालिका बापट. व्यासपीठावर डॉ.कुलदीप कामत ,श्री.कुडव, डॉ.नीता तोरणे, लेखिका प्रा.राधिका नागवेकर व इतर. 

स्वागत 

उदघाटन कार्यक्रमाचे 

मनोगत व्यक्त करताना प्रिया कालिका बापट 

मनोगत व्यक्त करताना प्रिया कालिका बापट 


उदघाटन कार्यक्रमाचे 

स्वागत 

स्वागत 

उदघाटन कार्यक्रमाचे 


उदघाटन कार्यक्रमाचे 

मनोगत व्यक्त करताना डॉ.कुलदीप कामत 

मनोगत व्यक्त करताना डॉ.नीता तोरणे 

मनोगत व्यक्त करताना प्रा.स्नेहा जांबोटकर 

मनोगत व्यक्त करताना मान्यवर प्रमुख पाहुणे 

मनोगत व्यक्त करताना प्रतिमा नागवेकर 

लेखिकेसोबत मान्यवर 

 

Thursday, April 2, 2026

काव्यानंद - कवितेचे आनंदगाणे 


मडगावच्या रवींद्र भवनाचा स्तुत्य उपक्रम म्हणजे "काव्यानंद" !!!

गोवाभरातील बहुभाषिक कवी कवयित्रींना एकत्र एका काव्यापीठावर आणण्याचे कसब भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी बखुबी सांभाळले आहे. त्याचबरोबर भवनाच्या टीमचे तसेच इतर सदस्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. खऱ्या अर्थाने कवी कवयित्रींचा सन्मान आणि गौरव करणारी संस्था म्हणजे मडगावचे रवींद्र भवन !!!

प्रिया कालिका बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यानंदची काही क्षणचित्रे 

काव्यानंदचे आनंदगाणे 

गोमंतकीय कवयित्री 

स्वागत करताना रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक 

स्वागत करताना रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक 

स्वागत करताना रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक 

स्वागत करताना रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक 

स्वागत करताना रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक 

कवितेवर बोलताना प्रिया कालिका बापट 

कविता सादर करताना स्नेहा केणी 

कविता सादर करताना स्मिता कारो 

कविता सादर करताना महेश पारकर 

कविता सादर करताना नुतन दाभोलकर 

कवितेवर भाष्य करताना प्रिया कालिका बापट

कवितेवर भाष्य करताना प्रिया कालिका बापट 

काव्य निवेदिका मंजुषा तळावलीकर 

गोमंतकीय कवयित्री वंदन नाईक,मंजुषा तळावलीकर, रजनी रायकर 

काव्यानंदच्या कवयित्री, निवेदिका आणि कार्यक्रम अधिकारी 

काव्यानंदच्या कवयित्री सुनीता  पेडणेकर, नुतन दाभोलकर, स्नेहा  केणी, प्रिया कालिका बापट , स्मिता कारो आणि कवी महेश पारकर 

काव्यानंदचे काव्ययात्री 

काव्यानंदचे काव्ययात्री 

मंजिरी वाटवे , नुतन दाभोलकर आणि प्रिया कालिका बापट 

काव्यानंदचे काव्ययात्री 

काव्यानंदच्या निमंत्रित अध्यक्ष प्रिया कालिका बापट कविता सादर करताना