कवयित्री आणि कविता : आस्वादक संवाद
मनसा आंतरराष्ट्रीय कवयित्री संमेलनातील विशेष परिसंवाद
मनसा क्रिएशन आणि कला संस्कृती संचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कविता दिनानिमित्त संस्कृती भवन मधील सभागृहात आयोजित केलेल्या मनसा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवात "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद हा विशेष परिसंवाद प्रा. प्रतिभा सराफ व डॉ. प्रमदा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यावेळी सन्माननीय पाहुण्या म्हणून लेखिका मनस्विनी प्रभुणे उपस्थित होत्या. परिसंवादात महाराष्ट्रातील कवयित्री मंदा खंडारे, मेघना साने, सरिता पवार, मोहना कारखानीस व गोव्याच्या राधिका नागवेकर या वक्त्यांनी विवेचन केले.
प्रा. राधिका नागवेकर यांनी चंद्रिका पाडगावकर, हर्षा शेट्ये व नयना आडारकर यांच्या कवितांवर भाष्य केले.
चंद्रिका आपल्या मराठी कोकणी कवितांतून मानवी जीवनातील अनुभवांना भिडतात. हरवलेल्या अस्तित्वाची जाणीव त्या व्यक्त करतात. सुंदर प्रतिमा त्या उभ्या करतात. हर्षा शेट्ये साध्या सोप्या भाषेत हरवलेले अस्तित्व मांडतात व वाचकांना अंतर्मुख करतात. नयना यांच्या कवितांतून स्त्रीविषयक जाणिवा दिसतात. स्त्रीवर लादलेली बंधने यावर त्या भाष्य करतात. या कविता वैविध्यपूर्ण आणि वेगळ्या आहेत.
मंदा खंडारे यांनी विदर्भातील कवयित्रींच्या कवितांवर भाष्य केले. त्यांनी ज्योती लांजेवार, प्रभा गणोरकर, विजया मारोतकर, आशा पांडे यांच्या कवितांची वैशिष्ट्ये सांगितली. मेघना साने म्हणाल्या, डॉ. निशिगंधा वाड ही बहुआयामी कवयित्री प्रतिमातूनच बोलते. शांता शेळके, शिरीष पै, प्रतिभा सराफ, मोहना कारखानीस यांच्या कवितांविषयी पण त्या बोलल्या. मोहना कारखानीस यांनी सिंगापूरच्या कवयित्री रुचा कुलकर्णी, प्रतिमा जोशी, सोनाली पाटील, नीला बर्वे आदींच्या कवितांविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, त्यांच्या कविता नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या परदेशात असल्या तरी त्यांच्या कवितात इथलीच मूल्ये आहेत.
सरिता पवार यांनी तळ कोकणातील कवयित्री संध्या तांबे, उषा परब, वैशाली पंडित, शरयू आसोलकर, सुनंदा कांबळे,कल्पना बांदेकर, श्वेतल परब, स्नेहा कदम, रुपाली कदम यांच्या कवितांवर प्रभावी भाष्य केले व त्यातील आशय नेमकेपणाने स्पष्ट करून सांगितले.
मनस्विनी प्रभुणे म्हणाल्या, शब्दांना आकार, उकार देणे हे कवितेचे काम आहे.शिल्पकाराप्रमाणे कविता घडवावी लागते. उपमा, वृत्त, छंद, अलंकार याचा अभ्यास करून आलेली कविता वेगळी असते. डॉ. प्रमदा देसाई यांनी सांगितले की, कमीत कमी शब्दात अनुभव उत्कटपणे मांडणे म्हणजे कविता. अनुभव समृद्ध तेवढी कविता संपन्न होते. प्रतिभा सराफ म्हणाल्या, बोली भाषेतून लिहिलं पाहिजे त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होईल. चांगल्या कविता ऐकून, वाचून जगण्याच्या जाणिवा प्रगल्भ होतात.आज कवितांतून महानगरीय जाणिवा जाणवत आहेत.
 |
| प्रा.प्रतिभा सराफ आणि डॉ.प्रमदा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद" या परिसंवादात डावीकडून मोहन कारखानीस, मेघना साने, मनस्विनी प्रभुणे, डॉ.मंदा खंडारे , सरीता पवार आणि प्रा.राधिका नागवेकर. |
 |
| "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद" या परिसंवादात व्यक्त होताना प्रा.राधिका नागवेकर. |
 |
| उपस्थित मान्यवर समुदाय. |
 |
| उपस्थित मान्यवर |
 |
| "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद" या परिसंवादात व्यक्त होताना डॉ.मंदा खंडारे |
 |
| "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद" या परिसंवादात व्यक्त होताना मेघना साने |
 |
| उपस्थित मान्यवर कवयित्री |
 |
| "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद" या परिसंवादात मोहना कारखानीस |
 |
| "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद" या परिसंवादात व्यक्त होताना सरीता पवार |
 |
| "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद" या परिसंवादात व्यक्त होताना मनस्विनी प्रभुणे |
 |
| "कवयित्री आणि कविता:आस्वादक संवाद" या परिसंवादात व्यक्त होताना डॉ.प्रमदा देसाई |
 |
| उपस्थित मान्यवर |
 |
| उपस्थित मान्यवर |
 |
| उपस्थित |
No comments:
Post a Comment