मनसा क्रिएशन्सच्या "हंसा-२०२५"दिवाळी
अंकाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
सर्वोत्कृष्ट पुरस्कार
नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
पत्रकार संघाचा दिवाळी अंक २०२५ स्पर्धेचा "सर्वोत्कृष्ट पुरस्कार"
गोव्यातील मनसा क्रिएशन्सच्या "हंसा" दिवाळी अंकाला प्राप्त झाला आहे.
ज्येष्ठ नेते व प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते संपादक प्रिया कालिका बापट
यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा अंक यावेळी दिवाळी अंकांच्या परंपरेला वाहिलेला आहे. यात
मोहिनी, नवल, हंसचे संपादक अभिराम अंतरकर, गंधालीचे संपादक मधुकर वर्तक, आवाज दिवाळी अंकाचे संपादक भारतभूषण पाटकर, ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते आदींचे माहितीपूर्ण
लेख आहेत. शिवाय गोवा आणि महाराष्ट्रातील लेखक, कवींचे यात लेख आणि कविता आहेत. "हंसा" दिवाळी
अंकाला यंदाचा मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा यंदाचा
उत्कृष्ट प्रथम पुरस्कार कुळवाडी दिवाळी अंकाला. द्वितीय शब्दवेल तर तृतीय
पुरस्कार सहस्रबाहु दिवाळी अंकाला मिळाला आहे. विशेष विषयाला वाहिलेला प्रथम
पुरस्कार वेदांतश्री दिवाळी अंकाला तर द्वितीय अर्थशक्ती दिवाळी अंकाला मिळाला
आहे. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून
नाशिकचे उपमहापौर मा.श्री. विलास शिंदे, नगरसेवक तथा शिवसेना उपनेते, मा.श्री. अजय बोरस्ते,
किमस् मानवता हॉस्पिटलचे सर्जन मा.श्री. डॉ. अमित केले, शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा.सौ.
जयश्रीताई थोरात, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा
मा.डॉ.आशाताई पाटील, एसएमआरके
महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.सौ. संध्या मिलिंद खेडकर, नाशिकच्या लोकप्रिय साहित्यीक व समुपदेशक मा.
प्रा.डॉ. सौ. शोभा सातभाई,
मिसेस इंडिया दुबई
विजेत्या मा.अश्विनी अत्रे, भाजपचे शहराध्यक्ष मा.श्री.सुनील केदार, चित्रपट निर्माते नाना बच्छाव आदी मान्यवर
उपस्थित होते.
मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पत्रकार संघाच्या कार्याचे
कौतुक केले. तसेच पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या
संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी
विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment