Thursday, April 16, 2026

 

स्वागत "नारी शक्ती वंदन" अभियान: अखेर प्रतीक्षा संपली. "नारी शक्ती वंदन" अभियानाचे  गोव्यातही सर्व क्षेत्रातील महिलांकडून जोरदार स्वागत झाले. महिलांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आणि निर्णयाचा गौरव केला. परिषदांबरोबरच विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले. राजकीय क्षेत्रातील महिलांपासून ते अगदी शैक्षणिक, औद्योगिक, साहित्यिक आदी सर्व क्षेत्रातील महिलांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजातील स्त्री नेतृत्वाचे प्रदर्शन या अभियानाचे स्वागत करताना दिसले. तसेच  गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी गोवाभरात झालेल्या कार्यक्रमांमध्ये महिलांचे स्वागत केले. 

वेदाचार्य स्नेहा भागवत यांनी पणजीत नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गोवाभरातील विविध क्षेत्रातील महिला प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होत्या. यात आयडा मुखर्जी यांचे प्रभावी मार्गदर्शन उपस्थित महिलांना लाभले. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी या अभियानाचे महत्व पटवून दिले. पणजीतील इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझातील कार्यक्रमामध्ये, सभागृहे  खचाखच भरली होती. यावरून महिलांचा उत्साह दिसत होता. राज्यात ठिकठिकाणी असेच कार्यक्रम झाले. त्यातही महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. 
























No comments: