कालिका बापट यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार
संघाचा "दामिनी राष्ट्रीय पुरस्कार"
नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणारा पत्रकारितेसाठीचा
"दामिनी राष्ट्रीय पुरस्कार" गोव्याच्या नामवंत पत्रकार प्रिया कालिका
बापट यांना प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब सभागृह, शालिमार नाशिक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा
मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यावेळी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या
कर्तृत्ववान महिलांना या प्रतिष्ठेच्या
दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे उपमहापौर मा.श्री. विलास शिंदे, नगरसेवक तथा शिवसेना उपनेते, मा.श्री. अजय बोरस्ते,
किमस् मानवता हॉस्पिटलचे सर्जन मा.श्री. डॉ. अमित केले, शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा.सौ.
जयश्रीताई थोरात, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा
मा.डॉ.आशाताई पाटील, एसएमआरके
महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.सौ. संध्या मिलिंद खेडकर, नाशिकच्या लोकप्रिय साहित्यीक व समुपदेशक मा.
प्रा.डॉ. सौ. शोभा सातभाई,
मिसेस इंडिया दुबई
विजेत्या मा.अश्विनी अत्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपचे शहराध्यक्ष मा.श्री.सुनील केदार, चित्रपट निर्माते नाना बच्छाव आदी मान्यवर
उपस्थित होते.
सुरुवातीला नाशिकच्या ज्येष्ठ नृत्यांगना सुरेखा मैंद यांनी
गणेश वंदना सादर केली. त्यानंतर
सावित्रीबाई फुले व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष
डॉ. महेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक करून महिला दिनाचे औचित्य विशद केले.
त्याचप्रमाणे उपमहापौर विलास शिंदे, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, डॉ.अमित केले, डॉ. आशाताई पाटील, प्राचार्या सौ. संध्या खेडकर, लक्ष्मण सावजी, प्रा.शोभा सातभाई आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त
करून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पुरस्कारार्थींचे अभिनंदन
केले. यानंतर महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातून आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा
दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने तुतारीच्या निनादात शाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी
विशेष परिश्रम घेतले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा
पत्रकारितेसाठीचा "दामिनी राष्ट्रीय पुरस्कार" प्रिया कालिका बापट यांना
प्रदान करताना डॉ.अमित केले. सोबत डॉ. महेंद्र देशपांडे , लक्ष्मण सावजी व इतर मान्यवर.

No comments:
Post a Comment