प्रा.राधिका नागवेकर यांचे "मुक्काम पोस्ट मन" प्रकाशित
गोमंतकीय मराठी साहित्य सृष्टीत नवीन पुस्तकाची भर
प्रथमच पत्ररूपात ललित लेख संग्रह
गोमंतकीय युवा लेखिका प्रा. राधिका नागवेकर यांच्या "मुक्काम पोस्ट मन" या ललित लेख संग्रहाचे नुकतेच पिळर्ण येथे प्रकाशन झाले. यावेळी राधिका यांचे मित्रमंडळ, कुटुंबीय, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.कुलदीप कामत यांनी पुस्तकावर भाष्य करताना लेखिकेच्या संवेदनशील लेखणीचे कौतुक केले. पदार्पणातच एक चांगले पुस्तक गोमंतकीय साहित्य सृष्टीला बहाल केले आहे, अश्या शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुस्तकावर बोलताना डॉ.नीता तोरणे म्हणाल्या, राधिकाच्या लेखणीत धार आहे. या जोरावरच राधिका साहित्य सृष्टीत मोलाचे कार्य कारणार आहे. प्रिया कालिका बापट म्हणाल्या, राधिका ही गोव्यातील युवा कवयित्री, लेखिकांमधील अग्रणी असे व्यक्तिमत्व असून पदार्पणातच ललित लेख संग्रह प्रकाशित करून तिने षटकार मारला आहे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त करताना राधिका यांचे कौतुक करून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. स्थानिक उपसरपंच तसेच श्री. कुडव यावेळी उपस्थित होते. प्रा.स्नेहा जांबोटकर आणि स्नेहा मोरजकर यांनी पुस्तकातील लेखांचे वाचन केले. राधिकाच्या आई प्रतिमा नागवेकर यांनी आभार मानले. तर सुश्मिता यांनी सूत्रसंचालन केले.
![]() |
| पुस्तकावर बोलताना प्रिया कालिका बापट. व्यासपीठावर डॉ.कुलदीप कामत ,श्री.कुडव, डॉ.नीता तोरणे, लेखिका प्रा.राधिका नागवेकर व इतर. |
![]() |
| स्वागत |
![]() |
| उदघाटन कार्यक्रमाचे |
![]() |
| मनोगत व्यक्त करताना प्रिया कालिका बापट |
![]() |
| मनोगत व्यक्त करताना प्रिया कालिका बापट |
![]() |
| उदघाटन कार्यक्रमाचे |
![]() |
| स्वागत |
![]() |
| स्वागत |
![]() |
| उदघाटन कार्यक्रमाचे |
![]() |
| उदघाटन कार्यक्रमाचे |
![]() |
| मनोगत व्यक्त करताना डॉ.कुलदीप कामत |
![]() |
| मनोगत व्यक्त करताना डॉ.नीता तोरणे |
![]() |
| मनोगत व्यक्त करताना प्रा.स्नेहा जांबोटकर |
![]() |
| मनोगत व्यक्त करताना मान्यवर प्रमुख पाहुणे |
![]() |
| मनोगत व्यक्त करताना प्रतिमा नागवेकर |
![]() |
| लेखिकेसोबत मान्यवर |
















No comments:
Post a Comment